Comedian Santosh Chordia Passed Away | एकपात्री हास्यवी संतोष चोरडिया यांची अचानक एक्झिट; ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Comedian Santosh Chordia Passed Away | आम्ही एकपात्री या संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांना एकत्र करुन त्यांना व्यासपीठ मिळवून देणारे लोकप्रिय हास्यकलावंत संतोष चोरडिया यांचे बुधवारी पहाटे ह्दयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन (Comedian Santosh Chordia Passed Away) झाले. ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Pune News)

संतोष चोरडिया हे रंगभूमी, दूरचित्रवाणी (Television) आणि चित्रपट (Movies) अशा तीनही माध्यमांमध्ये गेली ३८ वर्षे कार्यरत होते. हास्यसम्राट कार्यक्रम तसेच एम २ जी २ या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांची घेतलेल्या मुलाखतीने ते घराघरात पोहचले.

जीना इसी का नाम है, फुल २ धमाल या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण ते करत असत. लंडन, इस्त्राइल, ओमान अशा देशातील रसिकांना हसवा हसवी या एकपात्री प्रयोगाने ते सर्वपरिचित होते. त्यांनी १५ हजारांहून अधिक प्रयोग केले. दुसरी गोष्ट, कॅपचीनो, दगडाबाईची चाळ, प्रेमा, सरगम इत्यादी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. (Comedian Santosh Chordia Passed Away)

आपल्या एकपात्री प्रयोगातून त्यांनी सातत्याने एड्सग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले.
आम्ही एकपात्री संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचे काम ते करत असत.
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करुन या कलांच्या प्रसारासाठी चोरडिया यांनी २०२१ मध्ये
रंगकर्मी चोरडिया फाऊंडेशन स्थापन केले होते. त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

सरह्द संस्थेच्या माध्यमातून कारगिलला जाऊन सीमेवर तैनात भारतीय सैनिकांचे मनोरंजन त्यांनी केले होते.
जगभरातील रसिकांना त्यांनी हसवले होते, त्यावरुन त्यांना हास्यवीर म्हणून संबोधले जायचे.
अशा या हास्यवीराची एक्झिट मात्र चटका लावून जाणारी ठरली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका हरपला

कट का मारला म्हणत वकिलाला मारहाण, दोघांना अटक; चाकण मधील घटना

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू, 12 वर्षाचा मुलगा जखमी