Pimpri Chinchwad Accident News | पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू, 12 वर्षाचा मुलगा जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Accident News | पिंपरी चिंचवड शहरातील त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर मंगळवारी (दि.12) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. 12 वर्षाच्या मुलासह दुचाकीवरुन जात असताना दुचाकीला डंपरची धडक बसली. यामध्ये दुचाकी चालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. नवनाथ भानूदास गायकवाड (वय-40) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर दीपक नवनाथ गायकवाड (वय-12 दोघे रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) हा अपघातात (Pimpri Chinchwad Accident News) थोडक्यात बचावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड हे त्यांचा मुलगा दीपक याच्यासह दुचाकीवरुन जात होते.
त्यावेळी त्रिवेणी नगर-तळवडे रस्त्यावर (Triveni Nagar-Talawade Road) भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची
त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामुळे नवनाथ हे दुचाकीवरुन खाली पडून डंपरसोबत शंभर फूट फरपटत गेले. यात डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांचा मुलगा दीपक बाजूला पडल्यामुळे तो थोडक्यात बचावला. (Pimpri Chinchwad Accident News)

अपघातानंतर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे
(PCMC Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील रक्ताचे डाग
धुवून काढले. यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोळा मारुन ओढले मिठीत; तरुणाला अटक

पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार, चार जणांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना

Police Suspended In Pune | कोथरूड परिसरातील घडलेल्या 4 डिसेंबरच्या ‘त्या’ प्रकरणात वाहतूक पोलीस तडकाफडकी निलंबीत