वाळीत टाकलेल्या कुटुंबाची जातपंचायतीविरूद्ध तक्रार, दंडाच्या नावाखाली उकळले पैसे  

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

जतमधील एका कुटुंबाला जातपंचायतीने वाळीत टाकले आहे. विविध कारणे पुढे करून जातपंचायतीने या कुटुंबाची आर्थिक लुट केली. दंडाच्या नावाखाली ही लुट सुरू राहिल्याने या कुटुंबाने अखेर जातपंचायतीच्या विरोधात पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मारूती मुकिंदा कोळी (७०) यांच्या कुटूंबियांनी ही तक्रार दिली आहे. जातपंचायतीमधील दहा जणांनी कुटूंबावर अन्याय केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce1c02b7-accf-11e8-abbe-69630e3d08fe’]

मारूती कोळी हे जतमधील स्टील कॉलनीत कुटुंबासह राहतात. दोन पत्नी, दोन मुली व तीन मुले असा परिवार आहे. मारूती कोळी यांना दोन पत्नी असून त्या दोघीही डोक्‍यावर कडकलक्ष्मी घेवून गावोगावी फिरून धान्य व पैसे गोळा करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मारूती यांना गेल्या दहा वर्षांपासून अर्धांगवायूचा त्रास आहे. जत परिसरात महादेव कोळी समाजाची १० ते १२ कुटूंब असून स्टील कॉलनी आणि पारधी ताड्याजवळ अशा दोन ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. येथील लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. आण्णाप्पा लक्ष्मण कोळी (चडचण), स्वामी भिमाप्पा कोळी, दुर्गाप्पा बुडाप्पा कोळी, शंकर शामराव कोळी (सर्व इंडी), दुर्गाप्पा अण्णाप्पा कौही (सोलापूर), रामू सायाप्पा कोळी, बालाप्पा शिनाप्पा कोळी (उस्मानाबाद), शिवाप्पा निंगाप्पा कोळी, मयाप्पा मारूती कोळी (जत) या दहा जणांची महादेव कोळी समाजाची पंचायत आहे. समाजातील सर्व गोष्टींचे नियंत्रण या पंचायतीकडूनच केले जाते.

मारूती कोळी यांच्या पाहिल्या पत्नीचा विवाह झाला. त्यावेळी जातपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचा आरोप जातपंचायतीने करत त्यांना एक लाखांचा दंड केला होता. तो दंडही मारूती यांनी जातपंचायतीकडे जमा केला. परंतु, त्यानंतर जातपंचायतीकडून पुन्हा दोन लाख रूपयांची मागणी केली जात होती. एवढे पैसे देण्याची मारूती कोळी यांची आर्थिक स्थिती नसल्याने जातपंचायतीने त्यांच्या कुटूंबियांना वाळीत टाकले. यामुळे त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच पाहुण्यांनाही घरी येण्यापासून पंचायतकडून रोखले जाते आहे. कोणत्याही कार्यक्रमात मारूती कोळी यांचे कुटुंब गेल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. दोन लाख दिल्याशिवाय घरी कोणी येणार नाही, असे पंचायतीने या कुटुंबाला बजावले आहे. जातीतून बहिष्कृत केल्यामुळे कोळी कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समाजातून बहिष्कृत करणाऱ्या पंचांवर खंडणीचा गुन्हा दाखल करून बहिष्कार प्रतिंबधक कायदा २०१६ प्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी मारूती कोळी यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

विवाहितेच्या खूनाचे कराडच्या येणपे गावात हिंसक पडसाद, ५० जणांवर गुन्हा

कोळी कुटूंबियांना बहिष्कृत केल्याची माहिती मिळताच अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राहूल थोरात, चंद्रकांत वंजाळे, शशिकांत सुतार, राजेंद्र मोटे, भटक्‍या विमुक्त जातीजमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास मोरे, सुधार समितीचे नितीन मोरे, गणेश निकम यांनी अधीक्षक शर्मा यांना निवेदन देण्यासाठी धाव घेतली.

शाळा, महाविद्यालयासमोर टवाळखोरी करणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई

एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना दुसऱ्या राज्यांत आरक्षण नाही : न्यायालय