Congress | अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी

मुंबई : काँग्रेसने (Congress) अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) शिवसेनेला (Shivsena) पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. येथील काँग्रेसची वोटबँक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत (BMC Election) फटका बसू शकतो अशी भीती स्थानिक काँग्रेस (Congress) नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे दिसत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तरी आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला मदत करणार का असा प्रश्न मुंबईतील काँग्रेस नेते विचारत आहेत. महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने यापूर्वीच म्हटले आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
मात्र, काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार, मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचे वेगळे मत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जगदिश आमिन कुट्टी (Jagdish Amin Kutty) यांना तिसर्‍या क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपाने (BJP) या आधीच मुरजी पटेल
यांची उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेना विरूद्ध भाजपा-शिंदे गट (Shinde Group) अशी येथे अटीतटीची
निवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title :- Congress | congress disagreement in congress over supporting shivsena in andheri by election fear of getting hit in upcoming bmc elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून काम करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना सल्ला

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर

CM Eknath Shinde | ‘त्या’ ST कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा ! उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय शिंदे सरकार बदलणार