काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी सोनियांच्या ‘दरबारी’ लॉबिंग, ‘या’ 8 दिग्गजांचं मात्र ‘फिक्स’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधींच्या दरबारी आले आहेत. काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांची 30 मिनिटे भेट झाली. या भेटीत विविध मद्द्यांवर चर्चा झाली असं थोरातांनी सांगितलं. दुसरीकडे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्लीत आले आहेत. नाना पटोलेही सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत येण्याची शक्यता आहे आणि तेदेखील सोनिया गांधींची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.

नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. इतकेच नाही तर आपल्या समर्थकांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही मागणी करण्यासाठी काँग्रेस नेते सोनिया गांधींकडे जात असल्याची माहिती आहे.

आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असणार आहेत.

कॅबिनेटपदासाठी काँग्रेस नेत्यांची संभाव्य नावे-

मुंबई (2) : वर्षा गायकवाड, अमीन पटेल
पश्चिम महाराष्ट्र (2) : सतेज बंटी पुाटील, विश्वजित कदम
मराठवाडा (2) : अशोक चव्हाण, अमित देशमुख
विदर्भ (3) : विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर

मत्रिपदासाठी शिवसेनेकडून पुढील नेत्यांची नावं चर्चेत-
दीवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसकर, गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादीकडून पुढील नावांची चर्चा-
धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, राजेश टोपे.

Visit : policenama.com