Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधी यांचे असेही ‘उत्तरायण’; ‘आता भारत न्याय यात्रा, मणीपूर ते मुंबई’

नवी दिल्ली : मकर संक्रातींच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते. तोच मुहूर्त साधत काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आपली उत्तरेतील राजकीय यात्रा १४ जानेवारी रोजी सुरु करणार आहे. तेलंगणा, कर्नाटक या दक्षिणेतील राज्यात काँग्रेसला यश मिळाले. त्यातूनच आता प्रामुख्याने उत्तर भारत पट्ट्यात राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरु होत आहे.

मणीपूर ते मुंबई (Manipur to Mumbai) अशी ही ६६ दिवसांची भारत न्याय यात्रा (Bharat Nyaya Yatra) काढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाळ (Congress General Secretary KC Venugopal) यांनी केली.

मणीपूर ते मुंबई या यात्रेत राहुल गांधी १४ राज्ये, ८५ जिल्ह्यातून ६२०० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. १४ जानेवारीला मणीपूरमधून सुरु होणारी ही यात्रा २० मार्चपर्यंत चालणार आहे. (Congress Leader Rahul Gandhi)

दक्षिणेत काँग्रेसला यश मिळाले असले तरी उत्तर भारतात भाजपने आपले वर्चस्व वारंवार दाखवून दिले आहे.
त्यामुळे उत्तरेतील या राज्यात काँग्रेसला पुन्हा स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न या यात्रेतून राहुल गांधी करणार आहे.
यात्रा सुरु असतानाच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Former MLA Sharad Patil Passed Away | जायंट किलर माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन

Nashik Police | नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसारित केला WhatsApp नंबर

संतापजनक! घरासमोर कपडे काढून महिलेचा विनयभंग, कोंढवा परिसरतील प्रकार