Congress Leader Vijay Wadettiwar | अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासंदर्भात वडेट्टीवार यांची धक्कादायक माहिती! ”चव्हाणांच्या मागे चौकशीचा फेरा…”

नागपूर : चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे (Ashok Chavan Resign) कारण स्पष्ट करू शकतील. मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. चव्हाणांच्या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली याबाबत वरील धक्कादायक माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, अशोक चव्हाणांनी अचानक हा निर्णय घेण्यामागचे कारण समजलेले नाही. त्यांची कोणाशी चर्चा झाली किंवा नाही, याबाबत मला कल्पना नाही. पण त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्यासोबत १६ वर्षांपासून मी काम केले. त्यांच्या मंत्रिमंडळात दोनदा होतो.

वडेट्टीवार यांनी म्हटले की, त्यांच्याशी माझे फार सलोख्याचे संबंध होते.
त्यामुळे कदाचित चव्हाण यांनी पक्षांतर केल्यामुळे वडेट्टीवार देखील करतील, अशा वावड्या उठवल्या जात आहेत.
परंतु स्पष्टपणे सांगू इच्छितो यात काही तथ्य नाही.

वडेट्टीवार म्हणाले, ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे,
या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदार राजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला आहे.
येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार