काँग्रेसचा विजय झाला, हार्ट अटॅकने कार्यकर्त्याचा जीव गेला

जळगाव : पोलीसनामा आॅनलाईन – काँग्रेसच्या विजयाचा आनंद एका कार्यकर्त्याच्या चांगलाच जीवावर उठल्याचं समोर आलं आहे. अत्यानंदामुळे हा प्रकार घडल्याचं समजत आहे. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला दणदणीत विजय अनेक जणांना नवी उर्मी देणारा ठरला. अशातच एका कार्यकर्त्याच्या मात्र जीवावर उठला. या आनंदामुळे जळगावातील काँग्रेस कार्यकर्त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अत्यानंदामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
सुरेश ठाकरे असं या कर्यकर्त्याचं नाव आहे. सुरेश ठाकरे हे जळगावातील पारोळ्यात राहतात. सुरेश ठाकरे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. शिवाय ते काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष होते. मुख्य म्हणजे पोराळा तालुक्यातील काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदे भूषवल्याचेही समजत आहे.
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला दणदणीत विजय मिळाला. दरम्यान काँग्रेसच्या विजयाचा निकाल ऐकताच त्यांना खूपच आनंद झाला. इतकेच नाही तर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सुरेश ठाकरे यांना जल्लोष करण्यासाठी पारोळ्याला येण्यासाठी फोन केला. दरम्यान काँग्रेसच्या विजयाचा निकाल ऐकून अति आनंदीत झालेल्या सुरेश ठाकरे हे फोनवरच पारोळ्याला जाण्याविषयी अधिक माहिती जाणून घेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सुरेश ठाकरे यांना विजयाचा हा अति आनंद  काही सहन झाला नाही. दरम्यान या हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांना आपला जीव गमवावा लागला.
फोन बोलत असतानाच अचानक सुरेश ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना तातडीने  धुळ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान रुग्णालयातच ठाकरे यांचा उपचारांदरम्यान  मृत्यू झाला. ठाकरे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली. याशिवाय या घटनेमुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांसह परिसरातही दु:ख व्यक्त केले जात आहे.