Congress Rahul Gandhi On Modi Govt | राहुल गांधींचा थेट सवाल, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींनी ओबीसींसाठी काय केले? देशातल्या 90 सचिवांमध्ये…’

नवी दिल्ली : Congress Rahul Gandhi On Modi Govt | मोदी सरकारला महिला आरक्षण द्यायचेच नाही. त्यांना जातिनिहाय जनगणना करायची नसल्याने विविध मुद्दे काढून दिशाभूल करायची आहे, पण देशातील ओबीसींची संख्या नेमकी किती आहे? हे आम्हाला समजलंच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेऊन जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली. (Congress Rahul Gandhi On Modi Govt)

जातीनिहाय जनगणनेवर का बोलत नाही?

ते संसदेचे विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, आमचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे. पण जातीनिहाय जनगणनेवर सरकार का बोलत नाही? देशात ओबीसींची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असतना त्यांना का डावलले जात आहे? (Congress Rahul Gandhi On Modi Govt)

राहुल गांधी म्हणाले, मी संसदेत विचारल्यानंतर पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसींसाठी खूप काम करत आहेत. एवढे काम करत असतील तर ओबीसी समाजातील ९० सचिवांपैकी फक्त ३ सचिव ओबीसी का?

मोदींनी ओबीसींसाठी काय केले?

अर्थसंकल्पाच्या याच विश्लेषणाबाबत मी दुसरा प्रश्न विचारला तो म्हणजे किती ओबीसी अधिकारी बजेट नियंत्रित करत आहेत? तेव्हा लक्षात आले की बजेटच्या केवळ ५ टक्केच ओबीसी अधिकारी बजेट नियंत्रित करत आहेत. मला समजत नाही की पंतप्रधान मोदी रोज ओबीसींबद्दल बोलतात पण त्यांनी त्यांच्यासाठी काय केले?

ओबीसींची संख्या समजलीच पाहिजे

राहुल गांधी म्हणाले, केंद्रात ९० सचिवांपैकी फक्त ३ ओबीसी असतील, तर भारतात ओबीसींची संख्या केवळ ५ टक्के आहे काय? जर नाही तर ती नेमकी किती आहे, हे आम्हाला समजले पाहिजे. यासाठी जातीय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसी समाजाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले आहे.

महिला आरक्षणाची शाश्वती नाहीच

ते पुढे म्हणाले, महिला आरक्षणाच्या विधेयकाचे आम्ही स्वागत केले. पण या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी किती
वेळ लागणार हे सरकारने स्पष्ट करावे. वास्तविक, महिला आरक्षण लागू करण्यापूर्वी जनगणना आणि सीमांकन
करावे लागेल, ज्यासाठी १० वर्षे लागतील, पण एवढे करूनही याची अंमलबजावणी होईल की नाही, ते पण माहित नाही.

जातनिहाय जनगणना नको म्हणून…

मग महिला आरक्षणाचे विधेयक आताच का आणले गेले, लक्ष विचलित आताच का केले गेले? त्याचे मुख्य कारण
म्हणजे ओबीसी जनगणना आहे. पण आम्हाला देशातल्या ओबीसींची संख्या माहिती पडायलाच हवी,
त्यासाठी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट