कांग्रेसचा राजीनामा देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने खरेदी केली 11 कोटींची ‘रोल्स रॉयस फँटम VIII’, कर्नाटकमध्ये ‘उलट-सुलट’ चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या १४ आमदारांपैकी एक आमदार पुन्हा आपल्या उद्योगाने चर्चेत आले आहेत. यावेळी ते राजकीय कारणासाठी चर्चेत आले नसून महागड्या गाडीच्या खरेदीमुळे ते चर्चेत आले आहेत. एमटीबी नागराज असे या आमदारांचे नाव असून त्यांनी ११ कोटी रुपयांची रोल्स रॉयल्स फँटम VIII खरेदी केली आहे. या गाडीसाठी त्यांनी यापेक्षा देखील अधिक किंमत मोजल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी बंड करत आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र त्यांनी या आमदारांना अपात्र ठरवल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली. या सतरा आमदारांमध्ये एमटीबी नागराज यांचा देखील समावेश होता. एमटीबी नागराज हे महागडी गाडी खरेदी करणारे नेते नसून याआधी देखील राज्यातील अनेक नेते यासाठी चर्चेत आले होते. एमटीबी नागराज हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार असून त्यांच्या या कार खरेदीचे विशेष हैराणी नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली संपत्ती १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे त्यांचे काँग्रेसमध्ये विशेष वजन होते.

दरम्यान, एमटीबी नागराज यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी त्यांचे मन बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला.

आरोग्यविषयक वृत्त –