काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, PM मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, अहमद पटेल जी यांच्या निधनाने दु:खी आहे. त्यांनी जीवनातील अनेक वर्ष जनतेच्या सेवेत घालवली. आपल्या तीष्ण बुद्धमत्तेमुळे ओळखले जाणारे अहमद पटेल यांची काँग्रेस पक्ष मजबूत करण्यातील महत्वाची भूमिका नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचे पूत्र फैजल यांच्या बोलणे झाले आहे आणि संवेदना व्यक्त केली. अहमद भाई यांच्या आत्म्याला शांती मिळो.

अहमद पटेल काँग्रेस पार्टीचे एक स्तंभ : राहुल गांधी
तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, हा एक दु:खद दिवस आहे. अहमद पटेल काँग्रेस पार्टीचे एक स्तंभ होते. ते आपल्या सर्वात कठिण काळात पार्टीसोबत उभे राहिले. ते एक मोठी संपत्ती होते. आम्ही नेहमी त्यांना आठवणीत ठेवू. फैजल, मुमताज आणि कुटुंबियांना माझे प्रेम आणि संवेदना.

अहमद भाई खुप धार्मिक व्यक्ती होते : दिग्विजय सिंह
तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पटेल यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, अहमद भाई खुप धार्मिक व्यक्ती होते आणि कुठेही असले तरी नमाज पढणे चुकवत नसत. आज देव उठनी एकादशी सुद्धा आहे ज्याचे सनातन धर्मात खुप महत्व आहे. अल्लाह उनको जन्नतउल फरिदौसमध्ये आला मकाम अता फरमाएं.

You might also like