Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Constipation | बद्धकोष्ठतेला इंग्रजीत कॉन्स्टिपेशन म्हणतात. ही पचनसंस्थेची समस्या असून यात व्यक्तीला मलत्याग करणे कठीण होते. काही लोकांना वाटते की बद्धकोष्ठतेच्या समस्येत मॅग्नेशियमचे सेवन फायदेशीर आहे. यात कितपत तथ्य आहे? या विषयी डायटेशियन सना गिल यांच्याकडून जाणून घेऊया (Does Magnesium Help in Relieving Constipation).

मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेसाठी प्रभावी उपाय आहे का? – Does Magnesium Cures Constipation

मॅग्नेशियम एक मिनरल आहे. त्यात नैसर्गिक खनिजे आणि धातूंचे मिश्रण असते. मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते कारण ते पचनक्रियेस मदत करते. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते. पचनक्रिया व्यवस्थित झाली की बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. (Constipation)

मॅग्नेशियम आतड्यांमध्ये पाणी खेचते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मॅग्नेशियमचे मुख्य कार्य शरीरातील अनेक बायोकेमिकल प्रक्रियांना मदत करण्याचे आहे. मॅग्नेशियमचे सेवन हाडे, हृदयाचे आरोग्य, न्यूरोमस्क्युलर फंक्शनसाठी फायदेशीर मानले जाते. मॅग्नेशियमचे सेवन इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. इम्युनिटी मजबूत असल्यास पोटाचे इन्फेक्शन आणि आजार टाळता येतात.

मॅग्नेशियमने बद्धकोष्ठतेची समस्या कशी दूर करावी? – How to Cure Constipation

  • बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घेऊ शकता. पण योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • पालेभाज्या, धान्ये, अंकुरित कडधान्य, अक्रोड आणि बिया इत्यादींचे सेवन करा.
  • पाणी प्या आणि आहारात मॅग्नेशियम तसेच फायबरचा समावेश करा.
  • मॅग्नेशियमचे सेवन करण्यासोबतच व्यायाम करा. यामुळे बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, अपचनाची समस्या दूर होते.
  • बद्धकोष्ठतेची समस्या अधिक दिवस राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित