आता आवश्यक सामानांच्या किंमतीवर करा ‘कंट्रोल’, ग्राहक मंत्रालाय बनवतय ‘अ‍ॅप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांसाठी केंद्र सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेणार आहे. कारण लवकरच तुम्ही वस्तूंच्या किंमती स्वत: नियंत्रणात ठेवू शकणार आहात. सरकार गरजेच्या वस्तूंच्या किंमत नियंत्रणासाठी देशातील नागरिकांची मदत घेणार आहे. कंज्युमर मंत्रालयाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराच्या आसपास मिळणाऱ्या वस्तूंच्या किंमती सरकार बरोबर शेअर करु शकणार आहेत. स्थानिक बाजारात मिळणाऱ्या किंमती जाणून घेण्यासाठी केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालय अॅप तयार करणार आहे. या माध्यमातून सरकार किंमतीची माहिती गोळा करेल.

संपूर्ण देशात असतील 109 प्राइज मॉनिटरिंग सेंटर –
सध्या प्राइज मॉनिटरिंग सेंटरच्या माध्यमातून सरकार वस्तूंच्या किंमतीवर लक्ष ठेवून असते. देशात सध्या 109 मॉनिटरिंग सेंटर आहेत. ज्यातून सरकार 22 गरजेच्या वस्तूंचा पाहणी करते. असे असले तरी शहरातील सर्व ठिकाणच्या किंमतीची माहिती कळू शकत नाही. परंतू पीठ, डाळी, कांदा, टॉमेटो यांच्या किंमतीचे नियंत्रण करते.

मागील काही महिन्यात अनेक बाबी समोर आल्या आहेत, सरकारला किंमतींची योग्य माहिती मिळू शकली नाही. दिल्लीत एका ठिकाणी कांदा 40 रुपयांनी विकला जातो तर एका ठिकाणी 75 रुपयांना. यामुळे सरकारला वाटत आहे की, याचे क्लाऊड सोर्सिंग झाले आहे. यासाठीच एक अॅप तयार करण्यात येत आहे. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती या अॅपवर ते राहत असलेल्या परिसरातील वस्तूंचे भाव टाकतील आणि ते मंत्रालयापर्यंत पोहचेल. कोणत्या भागात वस्तूंची कमी आहे, कोठे पुरवठा वाढवला पाहिजे हे देखील मंत्रालयाला कळेल.

आरोग्यविषयक वृत्त –