Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : Cops Suspended In Pune | येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) 3 आरोपींना न्यायालयात (Pune Shivajinagar Court) हजर करुन त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याच्या नेमणुकीवर असताना त्यातील एका आरोपीला परस्पर खासगी रिक्षाने (Private Rickshaw) घेऊन जात असताना तो पळून गेल्याने तिघा पोलिसांना तडकाफडकी निलंबित (Cops Suspended In Pune) करण्यात आले आहे. (Pune Crime News)

पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे (Police Muralidhar Mahadu Kokne), राजूदास रामजी चव्हाण (Police Rajudas Ramji Chavan) आणि इतर एका पोलिस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी हा आदेश काढला आहे. (Cops Suspended In Pune)

तिघेही पोलीस कर्मचारी कोर्ट कंपनी म्हणून पोलीस मुख्यालयात (Police Headquarters Pune) नेमणूकीला आहेत. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) खटल्याच्या सुनावणीला हजर करुन कामकाज संपल्यावर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात जमा करण्याचे कर्तव्यावर तिघांची २ ऑगस्ट रोजी नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यातील एक आरोपी राजेश रावसाहेब कांबळे (Rajesh Raosaheb Kamble) याला पुढील तारीख देण्यात आली.

इतर आरोपींच्या खटल्याचे काम सुरु होते. त्यावेळी राजूदास चव्हाण
यांनी राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने घेऊन जाऊन येरवडा कारागृहात जमा करतो, असे सांगितले.
त्याला इतर दोघांनी होकार दिला. त्याप्रमाणे चव्हाण हे कांबळे याला रिक्षाने घेऊन जात असताना
त्याने तहान लागल्याचे सांगितल्याने वाटेत रिक्षा थांबविली.
कांबळे पाणी पिण्यासाठी रिक्षातून उतरला व साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला होता.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पळून गेल्याने तिघा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

6 August Rashifal : मेष, कर्क आणि मकरसह दोन राशीवाल्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, व्यापारात मिळेल नफा