Cordelia Cruise Drugs Case | आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट; समीर वानखेडे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cordelia Cruise Drugs Case | कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणामध्ये (Cordelia Cruise Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

आर्यन खान याला एनसीबीकडून क्लिन चीट दिल्याच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांना सवाल करण्यात आला त्यावेळी त्यांनी ‘सॉरी’ असं म्हटलं आहे. त्यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, ”मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Cordelia Cruise Drugs Case)

 

आर्यन खान आणि त्याच्यासोबतच्या 6 आरोपींचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आलेले आहे.
कारण त्यांच्याकडे ड्रग्ज असल्याचे कोणतेही सबळ पुरावे आढळून आलेले नाहीत.
या 6 जणांकडे कोणताही अमली पदार्थ सापडले नाही, पण त्यांच्यासोबतच्या मित्रांकडे हे पदार्थ सापडले होते, तेवढ्यावरून या लोकांना अटक करण्यात आली होती.
पण जेव्हा हा तपास एसआयटी (SIT Committee of NCB) कमिटीकडे गेला, त्यावेळी या 6 जणांकडे कोणतेही अमली पदार्थ आढळले नाहीत.
त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार केली जाणार नाही, असं सांगत एनसीबीने (Narcotics Control Bureau) त्यांना क्लिनचिट दिली आहे.

 

Web Title :- Cordelia Cruise Drugs Case | ncb officer sameer wankhede first reaction aftter aryan khan clean chit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा