Coronavirus : देशात 30 लाखापेक्षा जास्त ‘कोरोना’ व्हायरसची प्रकरणे, गेल्या 24 तासात 70488 नवे पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची प्रकरणे 30 लाखांच्या पुढे गेली आहेत. देशात कोरोनाच्या केसमधील ही सर्वात मोठी उसळी आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त 70,488 नव्या केस समोर आल्या आहेत. या दरम्यान 918 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 56,846 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब ही आहे की, बरे होणार्‍या रूग्णांमध्ये सुद्धा लागोपाठ वाढ होत आहे. आतापर्यंत 22, 79,900 लोक बरे झाले आहेत. मागील 24 तासात 59,101 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात कोविड-19 च्या एकुण प्रकरणांची संख्या वाढून 30,43,436 झाली आहे. भारतात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस 7,06,138 आहेत. भारतात कोरोनाने सर्वात जास्त कहर महाराष्ट्रात केला आहे. येथे 6,71,942 केस आहेत आणि 21,995 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात राज्यात कोरोनाची 14,492 नवी प्रकरणे समोर आली आणि 297 लोकांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाच्या 1,69, 516 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. आतापर्यंत 4,80,114 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, कोरोनाचा रिकव्हरी रेट 74.69 टक्के झाला आहे, तर मृत्यूदर घटून 1.87 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत एकुण 3,44,91,073 सॅम्पलची टेस्ट करण्यात आली आहे.

73 दिवसात येईल कोरोना वॅक्सीन
भारतात कोरोनाची प्रकरणे वाढत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. पहिली कोरोना वॅक्सीन ’कोविशिल्ड’ 73 दिवसात वापरण्यासाठी बाजारात उपलब्ध केली जाणार आहे. कोरोनाची ही वॅक्सीन पुण्याची बायोटेक कंपनी सीरम इन्स्टीट्यूट बनवत आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकार लोकांना कोरोनाची मोफत लस देणार आहे.