Corona Europe | ‘कोरोना’मुळे युरोपातील पर्यटनाला पुन्हा ‘ब्रेक’; ऑस्ट्रियात पुन्हा लॉकडाऊन, जर्मनीमध्येही परिस्थिती बिघडली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Corona Europe कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे असे वाटत असतानाच युरोपात कोरोनाची चौथी लाट (corona 4th wave) आली आहे. अचानक रुग्णसंख्या वाढू लागली असून ऑस्ट्रिया सरकारने (Australia Government) पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावले आहे. चौथ्या लाटेमुळे लॉकडाऊन (Lockdown) लावणारा युरोप  (Corona Europe) हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे पर्यटनाला ब्रेक लागला असून ख्रिसमसच्या सुट्यातील प्रवासाचे नियोजनही कोलमडले आहे.

केवळ ऑस्ट्रियाच नव्हे तर जर्मनीतही (germany corona) रुग्णसंख्या वाढत गेली आहे. त्यामुळे या ठिकाणीही लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात आहे. नाट्यमयरीत्या आलेल्या चौथ्या लाटेने जर्मनीला जबर तडाखा दिला असल्याचे जर्मनीच्या मावळत्या चॅन्सेलर अँजेला मर्केल (chancellor of germany angela merkel) यांनी सांगितले. तर दुसरीकडे नेदरलँडमध्ये (nederland coronavirus) गुरुवारी अचानक २३ हजार नवे रुग्ण सापडले. डिसेंबर २०२० मध्ये कोरोना शिखरावर असतानाही नेदरलँडमधील (nederland) रुग्णसंख्या १३ हजार होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथे अंशत: लॉकडाऊन लावला आहे. पूर्व युरोपात (Corona Europe) लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रिया जर्मनी आणि नेदरलँड येथील ६४ ते ७३ टक्के नागरिकांचे पूर्णत: लसीकरण झालेले आहे.

ब्रिटनमधील (britain ) लसीकरणाचे (Britain Vaccination) प्रमाण ६८ टक्के आहे. या चौथ्या लाटेचा नाताळच्या सुट्ट्यांना मोठा फटका बसणार आहे. नाताळच्या (christmas) काळात ब्रिटनमधून अडीच लाख लोक टन ते तीन देश प्रवास करतात. त्यामुळे त्यांना आता फेरनियोजन करावे लागणार आहे. परंतु संकट कायम राहिले तर प्रवास रद्द होतील. महत्त्वाचे म्हणजे नाताळच्या प्रमुख बाजारापैकी एक असलेल्या म्युनिक येथील सगळे नियोजन यंदाही रद्द झाले असून यंदाचा स्की हंगामही धोक्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title :- BAN vs PAK | pakistan tour of bangladesh 2021 bangladesh vs pakistan 2021 hasan ali reprimanded for breaching icc code of conduct

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

 

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या