Coronavirus Impact : देशातील 19 राज्य संपुर्णपणे ‘लॉकडाऊन’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत. देशातील कोरोनाची परिस्थितीची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. आत्तापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती आहे.

आयसीएमआरचे (ICMR) संचालक बलराम भार्गव म्हणाले, देशभरात 12 लॉबोरेटरीजच्या चेन कोरोनाची चाचणी करण्याचे काम करत आहे. देशभरात या 12 लॅबची 15 हजार कलेक्शन सेंटर आहेत. भारतासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोनाव्हायरस दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात पोहचला नाही ना ? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च निकाल देणार आहे. ICMR चे डॉ. आर.आर. गंगाखेडकर यांनी मॅथेमेटिकल मॉडेलवर काम सुरु असून, मंगळवारी त्याचा निकाल येईल असं सांगितलं आहे.

लॉकडाऊन म्हणजे काय ?
लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे. जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. ज्या ठिकाणी लॉक डाऊन केले आहे त्या ठिकाणच्या लोकांना घरात राहणे बंधन कारक असते. त्यांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते. लोकांना केवळ औषध, अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी असते. नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी जसे पैसे काढणे यासाठी बाहेर पडण्याची परवानगी असते.