Lockdown : पंजाबमध्ये कर्फ्यू दरम्यान पोलिसांसोबत ‘धरपकड’, ‘फायरिंग’मध्ये अनेक जखमी

चंदिगढ :  वृत्तसंस्था –   पंजाबच्या फरीदकोटमध्ये कर्फ्यू दरम्यान पोलिसांवर गोळीबार केल्याचे प्रकरण समोर आले असून हे पोलिस एका नाक्यावर तैनात होते. सध्यातरी कोणाला गोळीबार केला हे अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी तपास सुरू झाला आहे. यापूर्वी पटियाला येथे कर्फ्यू पासच्या मागणीसाठी पोलिसांवर हल्ला झाला असताना त्यात पोलिस कर्मचाऱ्याचा हात कापला गेला होता.

वास्तविक, फरीदकोटच्या कोटकपूर येथील पोलिस ठाण्यात दोन जणांना थांबवण्यात आले असताना त्यांनी पोलिसांशी भांडण सुरू केले. यावेळी पोलिसांचा गणवेश फाडला. दरम्यान, एका व्यक्तीने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळीबार सुरू केला. दरम्यान अनेक लोक जखमी झाले असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पटियालामध्ये निहंग्यांनी केला होता हल्ला

रविवारी पटियाला येथे पोलिसांवर निहंग्यांनी हल्ला केला होता. खरंतर, पटियालामधील सब्जी मंडी परिसरातील निहंग्यांकडून कर्फ्यू पास मागितला गेला. यानंतर निहंग बॅरिकेड तोडून कार चालवण्याचा प्रयत्न करत असताना तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर कारमधील व्यक्तीने हल्ला करायला सुरुवात केली. यादरम्यानन एका निहंग्यांने तलवारीने हल्ला केला, त्यामुळे एएसआय हरजीत सिंह यांचे मनगट त्यांच्या हातापासून वेगळे झाले.

यानंतर निहंग बलबेडा परिसरातील गुरुद्वारा खिचडी साहेबमध्ये लपले. पाठलाग करत पोलिस अधिकाऱ्यांनीही गुरुद्वारा खिचडी साहेब गाठले. पटियाला झोनचे आयजी जतिंदर सिंह यांनी निहंग्यांना शरण येण्याचा इशारा दिला, पण त्यांनी गुरुद्वाराच्या आतून लाऊड स्पीकर्सवरून पोलिसांना धमकी देण्यास सुरुवात केली. त्यांनी आतून गोळीबारही केला.

कमांडो ऑपरेशननंतर आरोपीला केले अटक

नंतर कमांडो टीम गुरुद्वाराच्या आत पाठवली गेली. गुरुद्वारामध्ये कमांडो ऑपरेशन डेऱ्याचे प्रमुख बलविंदर सिंह यांनाही गोळी लागली आहे. या प्रकरणात गुरुद्वारा खिचडीपूर साहिब येथे तासभर चाललेल्या कमांडो ऑपरेशननंतर एका महिलेसह ११ आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुरुद्वारा प्रमुख बलविंदर सिंह हेही आहेत.