Corona Vaccination in Pune Rural Area | पुण्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाने घेतला वेग, केंद्रावर मोठ्या रांगा

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – Corona Vaccination in Pune | बहुप्रतिक्षेत असलेल्या लसीकरणाला या आठवड्यात पुन्हा सुरुवात झाली असून यामध्ये तरुणांचा मोठा उत्साह पहावयास मिळाला त्यामुळे थेऊर येथील लसीकरण (Corona Vaccination) केंद्रावर सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या जात असून गर्दीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतीने नियोजन केल्याने अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रम चालू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.
त्यामुळे संपूर्ण जगात सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे.
आपल्या देशात सुरुवातीला जेष्ठ नागरिकांचे लसीकरण घेण्यात आले.
त्यानंतर वय ४५ च्या पुढील नागरिकांना लस देण्यात आली तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
याची घोषणा एप्रिलमध्ये झाली खरी परंतु यासाठी लागणारा खर्च कोण करणार यावर बरेच दिवस गेले शेवटी केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस देण्याचे जाहीर केले.
त्यानुसार दि २१ जून पासून हे लसीकरण सुरु झाले.

या आठवड्यात पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी उरुळी कांचन लोणी काळभोर वाघोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सर्व केंद्रावर लसीकरण सुरू झाले,
तर बुधवारपासून कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत थेऊर, आळंदी म्हातोबा,
नायगाव येथे लसीकरण सुरू झाले.
कित्येक दिवस तरुणांकडून लसीबद्दल चौकशी केली जात होती आज प्रत्यक्ष लसीकरण सुरु होताच त्यासाठी गर्दी केली.
या आठवड्यात शुक्रवार पर्यंत कुंजीरवाडी (२२००)उरुळी कांचन (१५००) लोणी काळभोर (२४००) वाघोली (२०००) लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.
त्यानुसार लसीकरण केंद्रांना त्या उपलब्ध करुन लसीकरण चालू झाले आहे.

थेऊर येथे समुदाय आरोग्य अधिकारी शिल्पा दलाल, आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार,
सेविका भारती सोनवणे यांनी आपल्या मदतीला तारमळा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सरिता परदेशी व गावातील अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन लसीकरणाचे नियोजन केले.
आशा सेविकांचा बेमुदत संप मिटल्याने त्या शुक्रवार पासून पुन्हा जोमाने या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत,
ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी तरुणांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्याची सोय केली त्यामुळे लसीकरण अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात चालू आहे.

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ महेबूब लुकडे यांनी सांगितले की, लसीकरण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध चालू असून प्रत्येक लाभार्थ्यांना लस मिळणार आहे.
सध्या लस मुबलक उपलब्ध होत असून हा कार्यक्रम नियमितपणे चालू राहील तरी नागरिकांनी सहकार्य करावे व लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Corona Vaccination in Pune Rural Area | Vaccination gained momentum in rural Pune, with large queues at the center

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..

Vatpurnima | दुर्दैवी ! वटपोर्णिमेदिवशीच पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केले सपासप वार, सोलापूर जिल्ह्यातील घटना