Corona Vaccine : भन्नाट ऑफर ! कोरोना लस घ्या अन् 2 KG टोमॅटो मोफत मिळवा, रांगाच लागल्या

नवी दिल्ली, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : दिवसेंदिवस संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. देशाताल कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी ३० लाख ९३ हजार ८६१ जणांचं लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान देशातील एका लसीकरण नागरिकांना केंद्रावर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.

 

 

 

 

सध्या ४५ वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान, छत्तीसगड राज्यातल्या बीजापूर जिल्हा प्रशासनाने लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून एक शक्कल लढवली आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने “लस घ्या आणि दोन किलो टोमॅटो मोफत मिळवा” असं अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत कोरोनी लस घेतल्यानंतर नागरिकांना २ किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत. टोमॅटोसाठी का होईना लोकांनी लसकरण केंद्रावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी पुरूषोत्तम सल्लूर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला (ANI) याबाबत माहिती दिली आहे. बीजापूर जिल्ह्यातल्या ज्या-ज्या रुग्णालय आणि केंद्रांतून कोरोनाची लस दिली जात आहे त्या सर्व केंद्रांवर लस घेणाऱ्याला २ किलो टोमॅटो मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे लोक लसीकरणाकडे आकर्षित होत आहेत. आम्ही भाजी विक्रेत्यांना आवाहन केलं आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांना टोमॅटोचा पुरवठा करत आहेत” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार ५००० रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे. केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागणार आहे. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्यासोबत लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक मस्त टॅगलाईन द्यावी लागेल. तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. तुमचा हा फोटो आणि टॅगलाईन पाठवा. सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. यामुळे लसीसकरणासाठी लोकांना प्रेरणा मिळेल.