Covid-19 : पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 8 लाख लोकांमध्ये आढळल्या ‘कोरोना’ अँटीबॉडीज !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिका परिसरांमध्ये कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे, नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे का ? यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात शहरातील ते 33.9 टक्के जणांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. एकूण लोकसंख्येच्या समारे 8 लाख नागरिकांना कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे.

सर्वेक्षणातून असंही समोर आलं आहे, की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. पिंपरी -चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. डी. वाय पाटील मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं 7 ते 17 ऑक्टोबर रोजी पाहणी करण्यात आली.

कसं झालं सर्वेक्षण ?

यासाठी विविध 200 भाग निवडून 10 पथकं तयार करण्यात आली होती. 10 दिवस सर्वेक्षण करून 5000 जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तसंच आयजीजी अँटीबॉडी तापसणीसाठी आयसीएमआरद्वारे प्रमाणित अबोट सीएमआयए टेस्ट करण्यात आली होती.

निष्कर्ष

एकूण 27 लाख लोकसंख्या लक्षात घेता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 33.9 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये 37.8 टक्के , झोपडपट्टीसदृश भागातील नागरिकांमध्ये 38.3 टक्के, गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये 27.7 टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. तसंच 36.8 टक्के महिलांमध्ये तर 28.9 टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमधील अँटीबॉडीज अधिक विकसित असल्याचं दिसून आलं आहे. 51 ते 65 वर्षांच्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीज अधिक आढळून आल्या आहेत. त्याचा दर 35.5 इतका आहे. तसंच किशोरवयीन 12 ते 18 वर्षांच्या वयोगटात 34.9 टक्के तर 19 ते 33 या वयोगटात 29.7, 31 ते 59 वयोगटात 31.2 आणि 66 वर्षांवरील नागरिकांमध्ये 58.3 टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. कोविडमुळं असणारा सर्वसामान्य मृत्यूदर हा 0.18 टक्के असल्याचं या संशोधातून समोर आलं आहे.