दिलासादायक ! पुण्यातील NIV ने बनवलं ‘कोरोना’ कवच, ‘अँटीबॉडी’चा शोध घेणारी ‘स्वदेशी’ किट ELISA तयार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  कोरोना विषाणूमुळे देशात खळबळ उडाली आहे. देशात दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तपासणीसंदर्भात भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताने कोविड- १९ अँटीबॉडीचा शोध घेणारी चाचणी किट विकसित केली आहे.

https://twitter.com/drharshvardhan/status/1259473102540431360

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, कोविड -१९  या अँटीबॉडीचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने अँटी सार्स -सीओव्ही -२ मानव-तपासणी किट यशस्वीपणे विकसित केले आहे.