सचिन तेंडुलकर देखील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, स्वतः ला केले घरीच क्वारंटाइन, स्वतः ट्विट करून दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन : जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. संक्रमणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दरम्यान क्रिकेटचा देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शनिवारी ट्विट करून त्याने याबाबत माहिती दिली. तेंडुलकरने स्वत: ला घरी क्वारंटाइन केले आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना टेस्ट केली असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत म्हंटले की,  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वत: ला घरी क्वारंटाइन केले आहे.  या व्यतिरिक्त ते या साथीसंदर्भातील सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करीत आहेत.