Corona Virus : भारत सरकारनं ‘या’ 4 देशांच्या नागरिकांच्या व्हिसावर आणली तात्पुरती बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस भारतात येऊन धडकल्यानंतर देशाने कोरोनाचा धसका घेतला आहे. यानंतर आता भारत सरकारने उपाय योजना म्हणून इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपानमधून भारतात येणाऱ्या नागरिकांवर बंधने आणली आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार 3 मार्च किंवा त्यापूर्वी इटली, इराण, जपान, दक्षिण कोरियाच्या ज्या नागरिकांनी भारतात प्रवेश केलेला नाही त्यांना जारी केलेले नियमित व्हिसा/ ई-व्हिसा निलंबित (सस्पेंड) केले जात आहेत.

कोरोना व्हायरसने जगभर कहर माजवला आहे. चीनच्या सीमेवरील देशांमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की कोरोना व्हायरस कशा प्रकारे रोखता येईल यावर समिक्षा केली गेली आहे. विविध मंत्रालय आणि राज्य एकत्र येऊन काम करत आहेत. जे भारतात येणाऱ्या लोकांचे स्क्रीनिंग पासून ते तात्काळ आरोग्य सुविधा सर्व काही पूर्वत आहेत.

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने 3000 लोकांचा जीव घेतला, आता हाचा जीवघेणा व्हायरस दिल्लीनंतर नोएडापर्यंत पोहोचला आहे. इटलीवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोना आणल्याचे समोर आले आहे. त्याने मागील काही दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात दिल्लीला लागून असलेल्या नोएडाच्या एका खासगी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

चीनमध्ये पसरलेल्या कोरोनानंतर आता जगभरात अलर्ट देण्यात आला आहे. चीनच्या सीमेवर असलेल्या अनेक देशांत कोरोना पसरत आहे. चीनमध्येच कोरोनाने 2 हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. 20 हजार पेक्षा जास्त लोक या व्हायरसमुळे प्रभावित झाले. भारतात कोरोना व्हायरसची 4 प्रकरणं समोर आली आहे. दिल्ली, तेलंगणा, केरळ या राज्यात कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. हा व्हायरस रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये रिसर्च सुरु आहे जेणेकरुन या आजाराला रोखता येईल.