Coronavirus : ‘कोरोना’ बाधित व्यक्तीनं ठेवली ‘बर्थडे’ पार्टी अन् नोएडापर्यत पसरला ‘व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली आणि तेलंगणानंतर नोएडामध्ये देखील कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. गौतमबुद्ध नगरचे आरोग्य अधिकारी डॉ. अनुराग भार्गव आणि एसीएमो डॉ. सुनील दोहरे यांनी सांगितले की एका व्यक्तीने शुक्रवारी दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस ठेवला होता. 28 फेब्रुवारीला ही पार्टी झाली. नोएडाचे दोन कुटूंबीय देखील या पार्टीत सहभागी झाले होते. सीएमओने सांगितले की याची संपूर्ण माहिती उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे.

नोएडामध्ये कोरोना व्हायरसबद्दल सरकारी अधिकाऱ्यांनी ही पुष्टी केली गेली आहे. ज्या व्यक्तीने पार्टी दिली होती तो कोरोना बाधित असल्याचे कळाले आहे. हॉटेलकडून देखील यावर भाष्य करण्यात आले. त्यात ते म्हणाले की हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्याची (गेस्ट) काळजी घेण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि सरकारकडून या घटनेची माहिती मिळाल्यावर खबरदारी म्हणून पावले उचलण्यात आली आहेत. हॉटेलच्या रेस्ट्राॅं, पब्लिक एरिया, लॉकर्स आणि मिटिंग स्पेसमध्ये साफ सफाईचे काम सुरु केले आहे.

हयात हॉटेलने सांगितले की, 28 फेब्रुवारीला रेस्ट्राॅंमध्ये जे कर्मचारी होते, त्यांना 14 दिवस स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याच्या शरीराचे तापमान मोजले जात आहे. अद्याप हॉटेलमध्ये कोरोना बाधित कोणी आढळले नाही. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दिशानिर्देश दिले गेले आहेत. त्या कठोर पालन केले जात आहे, जेणेकरुन हॉटेलमधील गेस्ट आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेचे वातावरण राहिलं.

देशात कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली आहे. नोएडानंतर आता आग्रामध्ये कोरोना व्हायरसचे 6 संशयित रुग्ण आढळले. हे तेच लोक आहेत जे इटलीहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. सध्या 13 लोकांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे आणि सॅंपल चाचणीसाठी पुण्याच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मेडिकल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

सरकारने सांगितले की आग्रामध्ये 13 लोक असे आढळले, ज्यांच्यात कोरोना व्हायरसचे सिम्टम्स मिळाले आहेत. या 13 लोकांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी सक्रिय झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या 6 संशयित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरु आहे.

संक्रमणाच्या बातम्या येत असताना खबरदारी म्हणून डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे की तापमान 35 डिग्रीच्या वर गेले तर व्हायरसचे संक्रमण कमी होईल. कारण व्हायरस उष्णतेत जिवंत राहू शकत नाही. तसेच डॉक्टर लोकांना सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा असा सल्ला देत आहेत.