Coronavirus : 3, 5 आणि 8 वर्षाचे मुलं ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, इशारा देतायेत इंदौरचे आकडे

इंदूर :  वृत्तसंस्था –   बुधवारी मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे २० रुग्ण समोर आले असताना सोबतच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ८६ झाली आहे. राज्यात वाढते आकडे पाहता सर्वात चिंतेची बाब आहे ती राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण.

लहान मुलांना होत आहे संक्रमण

एका वृत्तसंस्थेनुसार, २० नवीन प्रकरणातील १९ इंदूरमधील असून एक खारगोनमधील आहे. चिंतेची बाब ही आहे की, इंदूरमधील जी प्रकरणे समोर आली आहेत ते ९ जण एकाच कुटुंबातील आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंदूरच्या तंजीम नगरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील ३ मुले कोरोना पॉजिटीव्ह आढळली असून त्यांचे वय ३, ५ आणि ८ वर्ष आहे.

कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत संक्रमणाचा विचार केला तर वृद्ध लोकांनाच हा आजार जास्त होत होता. पण आता कमी वयाच्या मुलांनाही संक्रमण होत असून हे चिंताजनक आहे.

गोरखपूरमध्ये २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये आजच कोरोनाने संक्रमित २५ वर्षाच्या एका व्यक्तीचा उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, बीआरडी रुग्णालयात २५ वर्षाचा तरुण भरती झाला होता. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. KGMU तपास अहवालात हा तरुण कोरोनाने संक्रमित होता.

पोलीस कर्मचारीही कोरोना पॉजिटीव्ह

इंदूरच्या कोरोना पॉजिटीव्ह लोकांमध्ये एक पोलीस अधिकारीही आहे. ऍडिशनल एसपी गुरु प्रसाद पराशर यांनी म्हटले की, आजारी पोलीस कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात भरती केले गेले आहे. डॉक्टरांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला आणि मुलीला रुग्णालयाच्या वेगवेगळ्या वॉर्डात ठेवले आहे. ज्या पोलीस ठाण्यात अधिकारी कार्यरत होता त्याला सॅनिटाइझ केले गेले आहे आणि संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना केली जात आहे.

इंदूरमध्ये कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे

इंदूरमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. इथे कोरोनाची ६३ प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जबलपूरमध्ये कोरोनाची ८ प्रकरणे समोर आली आहे. उज्जैनमध्ये ६, भोपाळमध्ये ४, शिवपुरी व ग्वाल्हेरमध्ये २-२ आणि खारगोनमध्ये १ प्रकरण समोर आले आहे.