जपानच्या ‘क्रुज’वर 130 हून अधिक भारतीय ‘अडकले’, 40 प्रवाशांना ‘कोरोना’ व्हायरस ‘संसर्ग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानच्या योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रुज जहाज डायमंड प्रिंसेसमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले ४० प्रवासी आढळले आहेत. या क्रुजवर १३० भारतीय देखील अडकले आहेत.

या क्रुजवर ३ हजार ७०० प्रवासी आहेत. क्रुजवरील २१ जपानी, ५ ऑस्ट्रेलियन, ५ कॅनडाच्या प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे जहाजावरील अन्य ३ हजार ७०० प्रवाशांमध्ये हा व्हायरस वेगाने प्रसरण्याची भिती आहे. या अलिशान क्रुजवर उपस्थित भारतीयांसाठी सरकार जपानी सरकारशी संपर्कात आहेत. या क्रुजवर १३० भारतीय असून ते सर्व कर्मचारी आहेत. या भारतीय नागरिकांचे कोरोना व्हायरसचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र, त्यांना अजून क्रुजवरच असून सर्वांना अजून १९ फेब्रुवारीपर्यंत क्रुजवर राहावे लागणार आहे.