Corona Virus : चीनमधील ‘लॅब’मध्ये ‘उगम’ झाला जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा ! आत्तापर्यंत घेतले 1800 जणांचे बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत १८०० लोकांचा बळी घेतला आहे. या प्राणघातक व्हायरसने पूर्ण जगालाच चिंतेत टाकले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ यावर उपाय शोधण्यात व्यस्त आहेत परंतु अजून कुणाला सफलता मिळालेली नाही. त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की कोरोना व्हायरस या जगात आला तरी कसा?

अहवालानुसार या प्राणघातक व्हायरसची सुरुवात चीनच्या हुबेई प्रांतातून झाली आहे. या व्हायरसचे खतरनाक परिणाम हे हुबेईची राजधानी वुहान येथे पाहण्यास मिळत आहेत. एका अहवालानुसार चीनमधील काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या व्हायरसचा जन्म वुहानमधील फिश मार्केटपासून थोड्या अंतरावर असलेल्या सरकारी संशोधन प्रयोगशाळेत झाला आहे.

चीनच्या सरकारी साउथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या म्हणण्यानुसार वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) मध्ये अशा व्हायरसचा जन्म होऊ शकतो. यामागील कारण असे आहे की लॅबमध्ये अशा प्राण्यांना ठेवले जाते जे अशा प्रकारचे रोग पसरवू शकतात. या लॅबमध्ये ६०५ वटवाघूळ ठेवण्यात आले होते. त्यांमधूनच कोरोना व्हायरसचा प्रसार झाला असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच या युनिव्हर्सिटीच्या रिसर्च पेपर मध्ये देखील हे सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसला जबाबदार असणाऱ्या वटवाघुळाने एकदा एक रिसर्चरवर हल्ला केला होता, ज्यात वटवाघुळाचे रक्त त्याच्या स्किन मध्ये मिसळले होते.

अहवालात असे देखील म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे ग्रस्त रूग्णांच्या शरीरात जीनोम सीक्वेंस ९६ किंवा ८९ टक्के होता, जो बॅट CoCzc4 कोरोना व्हायरस सारखा आहे. अहवालात असे सांगितले गेले आहे की देशी वटवाघूळ वुहानमधील सीफूड मार्केटपासून सुमारे ६०० मैलांच्या अंतरावर आढळतात. लोकांना वटवाघूळ न खाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की WHDC च्या एका संशोधकाने सांगितले होते की, वटवाघुळाचे रक्त त्वचेवर आल्यानंतर त्याने दोन आठवड्यांकरता स्वत:ला अलग ठेवले होते. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, WHDC मध्ये प्रथमच संसर्ग झालेल्या डॉक्टरांच्या ऐका गटाला युनियन रुग्णालयात हलविण्यात आले होते.

शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की कदाचित सुरुवातीच्या रुग्णांकडूनच हा व्हायरस आजूबाजूला पसरला असावा. तसेच अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, असे होऊ शकते की इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने हा व्हायरस लीक केलेला असावा.

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे सुमारे २,०४८ नवीन पुष्टी झालेले प्रकरण समोर आले आहेत आणि रविवारी ३१ प्रांतीय पातळीवरील भागात आणि शिंजियांग प्रोडक्शन अँड कोर्प्समध्ये १०५ मृत्यू झाले आहेत. चीनी आरोग्य प्राधिकरणाने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, चीन कोरोना व्हायरस विरुद्ध जोरदारपणे लढा देत आहे आणि देश लवकरच या संकटातून मुक्त होईल असा विश्वास आहे. वांग यी यांनी जर्मनीतल्या ५६ व्या म्यूनिच सुरक्षा परिषदेत हजेरी लावली होती त्या दरम्यान त्यांनी असे सांगितले.

चीनमधील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण १०,८४४ रुग्णांना रविवारी अखेरीस बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. चीनी आरोग्य प्राधिकरणाने सोमवारी याबाबत घोषणा केली. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आपल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे की, रविवारी १,४२५ लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

You might also like