Coronavirus : स्पेनमध्ये कोरोनाचे 2000 हजार नवीन रुग्ण, 24 तासात 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था – स्पेनमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचा दोन हजार नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर मागील 24 तासात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इटलीनंतर स्पेन हा युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

स्पेनने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 7 हजार 753 वर पोहचली आहे. त्यापैकी 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने जवळपास देशभरात जमावबंदी लागू केली आहे. कामावर जाणे, औषध किंवा वस्तू खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जगभरात 1 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग
कोरोना विषाणूमुळे स्पेनमध्ये वाढत्या मृत्युमुळे या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या सहा हजाराच्या पुढे गेली आहे. एएफपीने केलेल्या गणतीनुसार ही आकडेवारी देण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले. स्पेनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 105 लोकांच्या मृत्यूनंतर जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 6 हजार 36 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 59 हजार 844 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3 हजार 199 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. युरोपमध्ये साथीचा रोग झपाट्याने पसरत आहे. इटलीमध्ये 1 हजार 907 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराणी एलिझाबेथ यांनी बकिंघम पॅलेस सोडला
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बंकिंघम पॅलेस सोडून विंडसर कॅसलमध्ये राहण्यास गेल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आत्तापर्यंत 21 लोकांचा मृत्यू झाला आहे.