UP च्या 2 गावात 20 दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसणार्‍या 64 जणांचा मृत्यू,

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. आग्रापासून ४० किमी अंतरावर असलेल्या एत्मादपूरचेगाव कुरगवान व बामरौली कटारा येथे २० दिवसात ६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून गावातील सुमारे १०० जणांची कोरोना चाचणी केली असता २७ जणांचा अहवाल बाधित आला आहे. बाधित लोकांना कुरगवानमधील प्राथमिक शाळेतील आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी सुविधांची वाणवा असल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे वृद्धांना आता आग्रा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, एत्मादपूरचे गाव कुरगवान येथे २० दिवसात १४ जणांचा मृत्यू झाला असून गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, खोकला-सर्दी-ताप आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाबत गावातील लोकांमध्ये जागृती नाही. प्रशासनाकडूनही तसे प्रयत्न होताना दिसत नाही. काही लोक बाधित आढळले आहे परंतु भीतीपोटी ते शहरातील रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. विशेष म्हणजे बाधित लोक सरार्स पणे गावात वावरत असतात. आयसोलेशन सेंटरमध्ये हे लोक एका ठिकाणी बसत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे.

त्याचबरोबर बामरौली कटारा या गावातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या गावाची लोकसंख्या ४० हजार असून आतापर्यंत येथे ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे आरोग्य बिघडते, नंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येते आणि थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू होतो, असे गावच्या सरपंचांनी सांगितले. आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले ४६ जणांची कोरोना चाचणी केली असता दोन जण बाधित आढळले. नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे काम अदयाप सुरु आहे. लोकंचे मृत्यू होत असतानाही येथील लोक अजूनही बेफिकीर आहेत. कोरोना नियमांचे आजही पालन केले जात नाही.

गेल्या पाच वर्षांपूर्वी बमरौली कटारा गावात सार्वजनिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. याठिकाणी नर्स आणि फार्मासिस्ट येते होते, मात्र काही दिवसापासून येथे कोणीही येत नाही त्यामुळे या केंद्राला कुलूप लावण्यात आले आहे. असे गावकऱ्यांनी सांगितले.