Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 13,051 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Coronavirus | राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra Corona Cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 017 नवीन कोरोना बाधित (Corona-infected patient) रुग्णांचे निदान झाले आहे. तर 13 हजार 051 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 66 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.04 टक्के इतका झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.35 टक्क्यावर गेला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 27 हजार 097 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 56 लाख 48 हजार 888 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 20 हजार 207 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 196 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 289 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.
– 235 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 484080.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2855.
– एकूण मृत्यू – 8696.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 472529.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6277.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 179 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 223 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 मृत्यूची नोंद
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 262386.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1110.
– एकूण मृत्यू – 4321.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 256695.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4076.

Web Title : Coronavirus | 13,051 corona free in the last 24 hours in the state, find out other statistics

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल