Coronaviurs : ATM व्दारे देखील फोफावतोय ‘कोरोना’, पैसे काढताना ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू जगभर पसरत आहे आणि त्याद्वारे संक्रमित होणाऱ्यांची संख्या देखील सतत वाढतच आहे. दरम्यान गुजरातमध्ये एटीएमच्या माध्यमातून लष्कराच्या 3 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना काही खास गोष्टींची खबरदारी घ्यावी जेणेकरुन आपण कोरोनाला टाळू शकाल. त्याबद्दल जाणून घेऊया.

– जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा सॅनिटायझर सोबत ठेवा. आपण कोणत्याही पृष्ठभागास स्पर्श केला असल्यास, सॅनिटायझरद्वारे त्वरित हात स्वच्छ करा.

– जर कोणी आधीच एटीएम रूममध्ये उपस्थित असेल तर आत जाऊ नये. जोपर्यंत ती व्यक्ती पैसे घेऊन येत नाही, तोपर्यंत आपल्या बाहेर प्रतीक्षा करावी.

– बाहेर पडताना वेट वाइप्स आणि टिश्यू घेऊनच बाहेर पडावे. एटीएम लाईनमध्ये उभे असताना आपला चेहरा, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. ओळीत असलेल्या लोकांपासून एक मीटर अंतर ठेवा.

– एटीएम चेम्बर मध्ये कशालाही स्पर्श करू नये. जर चुकून कशाला स्पर्श झाला असेल तर लगेचच वाईप्स आणि सॅनिटायझरने हात साफ करा.

– एटीएम लाईनमध्ये उभे असताना जर कुणी ओळखीचा व्यक्ती मिळाला तर त्याच्याशी हस्तांदोलन न करता दुरूनच हॅलो किंवा नमस्कार करा.

– जर तुम्हाला सर्दी- खोकला आहे तर घराबाहेर चुकूनही पडू नये. जर एटीएममध्ये उभे असताना अचानक शिंक आली तर आपले तोंड हाताने किंवा टिश्यूने झाकावे.

– एटीएमच्या डस्टबिनमध्ये वापरलेला टिश्यू आणि मास्क टाकू नका. यामुळे इतरांमध्ये हा संसर्ग पसरतो.

– यावेळी पूर्णपणे डिजिटल व्यवहार करणे योग्य आहे. सर्व देयके आणि व्यवहार ऑनलाइन करा.