‘कोरोना’ औषधाबाबत रामदेव बाबांचे पुन्हा ‘ट्विट’, म्हणाले – ‘द्वेश करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतंजलीने कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा करत या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण 100 टक्के बरे होत असल्याचा दावा केला होता. कोरोनिल नावाचे औषध पतंजलनी मंगळवारी बाजारात आणले. मात्र यानंतर रामदेव बाबा यांना चारी बाजूंनी होत असल्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. आयुष मंत्रालयाने या औषधापासून स्वत: ला दूर केले. यानंतर सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्यावर टीका होत आहे.

मात्र, आता आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांना या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसंदर्भात सर्व दस्ताएवज मिळाले आहेत. तसेच ते संशोधनाच्या रिझल्टची सत्यता पडताळण्यासाठी या दस्ताएवजांचा अभ्यास करतील.हे पत्र येताच आता बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. आयुर्वेदाचा विरोध आणि द्वेश करणाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.

आयुष मंत्रालयाचे पत्र केले शेअर
बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबत आयुष मंत्रालयाने दिलेले पत्र जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहलं होते. या पत्राच्या उत्तरात मंत्रालयाने आचार्य बाळकृष्ण यांना एक पत्र लिहले आहे. त्यात, त्यांना औधाच्या क्लिनिकल ट्रायलसंदर्भातील सर्व दस्ताएवज मिळाले असल्याचे म्हटले आहे.

जाहिरात न करण्याचे आदेश
देशात आणि जगभरात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी कोरोनावरील लस शोधण्याचे काम सुरु आहे. अशातच योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केले आहे. हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. मात्र, पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात करू नये असे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहेत.

कोणीही कोरोनाच्या औषधाच्या नावावर प्रचार-प्रसार करू शकत नाही
भारत सरकारच्या निर्दैशानुसार कोणीही कोरोनाच्या औषधाच्या नावावर प्रचार-प्रसार करू शकत नाही. आयुष मंत्रालयाकडून वैधता मिळाल्यानंतर असे करण्यास परवानगी आहे. तसेच विभागाकडून पतंजलीला नोटीस जारी करून उत्तर मागवण्यात आले होते. मंगळवारी बाबा रामदेव यांनी मोठी पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला होता. ज्यामध्ये रामदेव बाबांनी त्यांच्या औषधाची क्लिनिकल चाचणी केल्याचा दावा केला आहे.