भाजपा आमदाराचा अजब दावा, म्हणाले – ‘रोज गोमूत्र प्यायल्यास कधीच होणार नाही कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. याच दरम्यान भाजपचे बुलुंदशहाचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना आणि कॅन्सर होणार नाही, असे म्हटले आहे.

आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी म्हटले आहे की, गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच दररोज 25 एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असे म्हटले आहे. तसेच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही, असे म्हटले आहे. लोधीनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. देवेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपा नेते राजीव शुक्लांनी जोरदार टीका केली आहे. हे सर्व अद्यापही सुरू आहे. कोर्टाने त्यांना शांत राहण्यास सांगितले पाहिजे. अशा विधानांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा विधानांची आता सवय झाली आहे. कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्टर असल्याप्रमाणे कोरोनावरील इलाज सांगून गोमातेला यात आणू नये, असे म्हटले आहे.