‘कोरोना’ व्हायरसवर राम गोपाल वर्मांचं ‘ट्विट’, म्हणाले- ‘मृत्यूही मेड इन चायना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळं जगभरात 3 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. देशात कोरानाची दहशत पसरली आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. प्रत्येक स्टार्स स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहेत. अलीकडे फिल्म मेकर राम गोपाल वर्मा यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. सध्या या ट्विटची खूप चर्चा होताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मी कधीच विचार केला नव्हता की, मृत्यूदेखील मेड इन चायना असेल.” राम गोपाल वर्मांचं हे ट्विट सध्या सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यांचं हे ट्विट शेअर केलं आहे. काहींना हे ट्विट लाईक करत कमेंटही केली आहे.

याशिवाय बॉलिवूडमधील इतरही अनेक कलाकार आहेत जे योग्य ती खबरदारी घेत आहे. अलीकडेच दीपिका पादुकोणनं आपला फ्रान्सचा दौरा रद्द केला होता. अ‍ॅक्टर प्रभासही नुकताच हैद्राबाद एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. त्यानंही मास्क लावलं होतं. याशिवाय राखी सावंतनंही होळी खेळू नका असं आवाहन केलं आहे. एअरपोर्टवर गेल्यानंतर सनी लिओनीदेखील एका चाहत्याला सेल्फी घेण्यास नकार दिला होता. पतीसोबत तिनंही चेहऱ्याला मास्क लावलं होतं. याशिवाय पंतप्रधान नरेंद्री मोदींनीही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असा सल्ला दिला आहे.