COVID-19 : सप्टेंबरपर्यंत येईल ‘कोरोना’ची लस, उत्पादन सुरू झाल्याचा ब्रिटिश वैज्ञानिकांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस जगात एक महामारी बनली असून जगात याचे २.२ लाख पेक्षा अधिक लोक संक्रमित आहेत, तर दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर उपचारासाठी अनेक देशांत संशोधन चालू आहे. सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत ब्रिटनदेखील आहे, जिथे शास्त्रज्ञ कोरोनावरील उपचार शोधण्यासाठी संशोधन करत आहेत.

आता ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वॅक्सिनॉलॉजी विभागाच्या प्राध्यापिका सारा गिलबर्ट यांनी कोरोना विषाणूची लस बनवल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना गिलबर्ट यांनी असा दावा केला कि ही लस सप्टेंबरपर्यंत येईल आणि म्हटले की आम्ही महामारीच्या एका आजारावर काम करत होतो, ज्याला एक्स नाव दिले होते. यासाठी आम्हाला योजना आखून काम करण्याची गरज होती.

त्यांनी म्हटले कि ChAdOx1 टेक्निकसह १२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आम्हाला एका डोसपासून प्रतिकारशक्तीचे चांगले परिणाम मिळाले आहेत, तर आरएनए आणि डीएनए तंत्रज्ञानाद्वारे दोन किंवा अधिक डोस आवश्यक आहेत. प्रोफेसर गिलबर्ट यांनी आपली क्लिनिकल चाचणी सुरू झाल्याची माहिती देत यावर्षी सप्टेंबरपर्यंत दहा लाख डोस उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

ऑक्सफर्ड येथील टीम या लसबाबत इतक्या आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे की क्लिनिकल चाचणीपूर्वीच त्यांनी उत्पादन सुरू केले आहे. या संदर्भात प्राध्यापक अ‍ॅड्रियन हिल म्हणाले की, टीमकडे आत्मविश्वास आहे. त्यांना सप्टेंबरपर्यंत वाट बघायची नाही, जेव्हा क्लिनिकल चाचणी पूर्ण होईल. ते म्हणाले की आम्ही मोठ्या प्रमाणात जोखीम घेऊन लस तयार करण्यास सुरवात केली आहे. जगातील विविध भागात एकूण ७ उत्पादकांसह उत्पादन केले जात आहे.

प्रोफेसर हिल म्हणाले की, ७ उत्पादकांपैकी तीन ब्रिटन, दोन युरोप, एक चीन व एक भारतातून आहेत. यावर्षी सप्टेंबर मध्ये किंवा जास्तीत जास्त वर्षाच्या अखेरीस या लसीचे १ मिलियन डोस मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की तीन टप्प्यातील चाचणीची सुरुवात ५१० व्हॉलिंटियर्ससह सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५००० व्हॉलिंटियर्स भरती होणे अपेक्षित आहे.

मिळाले २.२ मिलियन पाउंडचे अनुदान विशेष म्हणजे या लसीचा शोध घेणाऱ्या प्रोफेसर गिलबर्टच्या टीमला ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि द युके रिसर्च अँड इनोव्हेशनने २.२ मिलियन पाऊंडचे अनुदान दिले आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाही कोरोना झाला होता. कोरोनामुळे देशातील १४००० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.