Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75809 नवे पॉझिटिव्ह तर 1133 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 42.80 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42 लाख 80 हजार 423 इतकी झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी कोरोनाचे कमी रुग्ण आढळले. 24 तासात 75 हजार 809 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन दिवसात सलग 90 हजापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. सोमवारी 1133 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण मृतांची संख्या 72 हजार 775 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासात 74 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 33 लाख 23 हजार 951 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या 8 लाख 83 हजार 697 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भारताच्या तुलनेत मागील 24 तासात अमेरिकेत 25325 तर ब्राझील मध्ये 10188 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 24 तासात अमेरिकेत 286 आणि ब्राझील मध्ये 315 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह भारतात आढळून येत आहेत. मृत्यूचा आकडा देखील देवसेंदिवस वाढत आहे.

आत्तापर्यंत भारतात 5 कोटीपेक्षा अधिक चाचण्या

सोमवारी भारतातील कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी झाली आहे. या 5 कोटीपैकी 8.47% लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते मागील 24 तासात 7 लाखापेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यां करण्यामध्ये चीन सर्वात पुढं आहे तिथं आत्तापर्यंत 16 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या स्थानी अमेरिका असून तिथं 8 कोटी 74 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत याबाबतीत तिसऱ्या स्थानी आहे.

कोरोनामुळे असलेली प्रमुख राज्यांतील स्थिती

– महाराष्ट्रात सोमवारी 16 हजार 429 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 14 हजार 922 जण यातून बरे झाले आहेत. रुग्णांची संख्या आता 9 लाख 23 हजार 641 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 59 हजार 322 लोक यातून बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 36 हजार 934 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत 27 हजार 27 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

– आंध्रप्रदेश मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 5 लाखाच्या पुढे गेला आहे. 24 तासात 8 हजार 368 नवे रुग्ण सापडले असून 10 हजार 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत 5 लाख 6 हजार लोकांना कोरोना ची लफं झाली असून त्यातून 4 लाख 4 हजार 874 जण बरे झाले आहेत. 4 हजार 487 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

– दिल्ली मध्ये सोमवारी 2077 नवे कोरोना रुग्ण आढळले. आत्तापर्यंत 1,93,526 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1,68,384 रुग्ण त्यातून बरे झाले आहेत. दिल्लीत आत्तापर्यंत 4,599 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 20,543 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

– यूपी मध्ये मागील 24 तासात 1 लाख 30 हजार 464 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 5 हजार 649 जण पॉझिटिव्ह आढळले. आत्तापर्यंत 2 लाख 71 हजार 932 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 2 लाख 5 हजार जण बरे झाले आहेत आणि 3,976 जणांचा मृत्यू झाला आहे.

– बिहार मध्ये सोमवारी 1,369 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. संक्रमितांची संख्या वाढून 1 लाख 49 हजार इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 145 रुग्ण बारव झाले असून सध्या 16 हजार 120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 761 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगातील एकूण कोरोना रुग्ण

वल्डोमीटरच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत आत्तापर्यंत 64 लाख 85 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 लाख 93 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 42 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 72 हजार 816 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ब्राझील मध्ये आत्तापर्यंत 41 लाख 47 हजार कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 1 लाख 27 होकार जणांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही देशातील मृत्युदर 1.70%, 2.99% आणि 3.06% असा आहे.