COVID19 : नव्या ‘कोरोना’ व्हायरसबद्दल आपण काय जाणतो अन् काय नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेला कोरोनाव्हायरस २०१९ (कोविड-१९) भारतातही दाखल झाला असून याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक प्रकारची योग्य व अयोग्य माहिती दिली जात आहे, ज्यामुळे अर्थातच गोंधळ उडाला आहे. परंतु आपल्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.

कोरोनाव्हायरस हा एक संक्रमित व्हायरस आहे. कोरोनाव्हायरस एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीला खोकला, शिंक येते किंवा तो बोलतो तेव्हा विषाणू बाहेर पडून ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतो. न्यूमोनियासारखी लक्षणे या विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवतात. जसे कि ताप, कोरडा खोकला, नाक बंद होणे, घसा खवखवणे, थकवा, शरीरदुखी, अतिसार हे या आजाराची लक्षणे आहेत.

दरम्यान, या विषाणूमुळे संक्रमित ८० टक्के लोक कोणत्याही विशेष उपचारांशिवाय बरे होतात. संक्रमित झालेल्या जवळपास २ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार या विषाणूचा धोका वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. जे आधीपासूनच कोणत्याही रोगाशी झगडत आहेत. संसर्ग झालेल्यांमध्ये, ९ वर्षाखालील मुलांच्या संख्येत १ टक्क्यांनी घट झाली आहे आणि या वयात कोणत्याही मुलाचा बळी गेला नाही. महत्वाचे म्हणजे अँटिबायोटिक या व्हायरसवर काम करत नाहीत. तर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, साबण हा विषाणू नष्ट करण्यात मदत करू शकतो.

दरम्यान, कोणत्या प्राण्यापासून हा रोग पसरला आहे हे अद्यापपर्यंत माहित झालेले नाही. वटवाघळामुळे हा व्हायरस पसरल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तसेच कोविड-१९ चा उपचार करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी अद्याप कोणतीही अँटी-व्हायरल औषध किंवा लस तयार केलेली नाही.