Coronavirus Cases Today in India | देशात अनियंत्रित झाला कोरोनाचा वेग, आज 1 लाख 17 हजार नवीन केस, ओमिक्रॉनचा आकडा 3000 च्या पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus Cases Today in India | देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा वेग अनियंत्रित होत आहे. सोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) ची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. देशात मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या 1 लाख 17 हजार 100 नवीन केस समोर आल्या आहेत. (Coronavirus Cases Today in India)

तसेच, 302 लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची 3007 प्रकरणे समोर आली आहेत.
आज देशात कोरोनाची ताजी स्थिती काय आहे, ते जाणून घेवूयात…

 

आतापर्यंत 4 लाख 83 हजार 178 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशात आता सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 3 लाख 71 हजार 63 झाली आहे. तर या महामारीने जीव गमावणार्‍यांची संख्या वाढून 4 लाख 83 हजार 178 झाली आहे.

 

काल 30 हजार 836 लोक बरे झाले

आकड्यांनुसार, काल 30 हजार 836 लोक बरे झाले, ज्यानंतर अजूनपर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 केस समोर आल्या आहेत. (Coronavirus Cases Today in India)

 

आतापर्यंत 149 कोटीपेक्षा जास्त डोस दिले

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिम अंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस विरोधी व्हॅक्सीनचे 149 कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
काल 94 लाख 47 हजार 56 डोस दिले गेले आहेत, ज्यानंतर आतापर्यंत व्हॅक्सीनचे 149 कोटी 66 लाख 81 हजार 156 डोस दिले गेले आहेत.

 

काल 15 लाख 13 हजार 377 सॅम्पल केले टेस्ट

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) महिती दिली की,
काल भारतात कोरोना व्हायरससाठी 15 लाख 13 हजार 377 सॅम्पल टेस्ट करण्यात आले,
ज्यानंतर कालपर्यंत एकुण 6 कोटी 68 लाख 19 हजार 128 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

 

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 3007 केस

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे 3007 लोक संक्रमित झाले आहेत, तर यापैकी 1199 रूग्ण बरे झाले आहेत. देशात या व्हेरिएंटने संक्रमित राज्यांची संख्या 7 झाली आहे. सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्र आणि दिल्ली आहे.

 

ओमिक्रॉनमुळे देशात झाला दुसरा मृत्यू

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने दोन लोकांचा बळी घेतला आहे.
ओडिसाच्या बालनगीर जिल्ह्यात एका 50 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
ओमिक्रॉनमुळे ओडिसात मृत्यूचे हे पहिले प्रकरण समोर आले आहे, तर देशात हा दुसरा मृत्यू आहे.
यापूर्वी, राजस्थानच्या उदयपुरमध्ये एका ज्येष्ठाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला होता.

 

Web Title :-  Coronavirus Cases Today in India | coronavirus cases today india reports 117100 fresh covid cases and 302 deaths in the last 24 hours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन