Coronavirus | ‘कोरोना’वर नैसर्गिक प्रतिकारशक्ती लसीपेक्षाही अधिक प्रभावी; अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – गेल्या एक दोन आठवड्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून बूस्टर डोसवरही (Booster Dose) भारतात अधिक भर दिला जात आहे. मात्र अमेरिकेत (United States) केलेल्या एका अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीपेक्षा नैसर्गिक प्रतिकार शक्ती अधिक प्रभावी असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.

 

तज्ज्ञांचा सतर्क राहण्याचा इशारा
अमेरिकेतील तज्ज्ञांनी डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) कोरोनाच्या लाटेदरम्यान (Coronavirus) केलेल्या रिसर्चमधून समोर आलंय की, कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात निर्माण होणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती कोरोना लसीच्या रोग प्रतिकारशक्तीपेक्षा (Immunity) चांगली असते, असे या अभ्यासात म्हटले आहे. पण, संशोधकांनी सावधही केले आहे. लस न घेतलेल्यांना लसीकरण झालेल्या लोकांपेक्षा हॉस्पिटलायझेशन, दीर्घकालीन परिणाम आणि मृत्यूचा धोका जास्त आहे.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (US Centers for Disease Control and Prevention) निवेदनात म्हटले की, कोरोनाचा विषाणू सतत बदलत आहे. लसीकरणानंतर मिळालेली सुरक्षा आणि संसर्गानंतर मिळालेल्या सुरक्षेच्या अभ्यासात बदल झालेला पाहायला मिळत आहेत. असे असले तरी कोरोनाविरोधात एकमेव परिणामकारक उपाय म्हणजे लसीकरण आहे.

 

ओमायक्रोनपूर्वी झाला अभ्यास
कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आला. त्यानंतर ओमायक्रोन (Omicron Covid Variant). सध्या ओमायक्रोन बाधित रुग्ण संख्याही लक्षणीय आहे.
अमेरिकेत केलेला अभ्यास हा ओमायक्रोन व्हेरिएंटपूर्वी म्हणजेच 30 मे ते 30 नोव्हेंबर 2021 या दरम्यान केला आहे.
यासाठी न्यूयॉर्क (New York) आणि कॅलिफोर्नियामधील (California) रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
मात्र सध्या ओमायक्रोन चा संसर्ग वाढला आहे.
लसीकरण आणि कोरोनामुळे तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे ओमायक्रोन दाखवत आहे.
त्यामुळे या नव्या व्हेरिएंटवरही तज्ञ अभ्यास करत असून येत्या काही दिवसात ओमायक्रोन बाबत महत्वाची माहिती समोर येऊ शकेल.

 

Web Title :- Coronavirus | corona virus immunity natural immunity is more powerful than vaccine says in american study

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा