CoronaVirus | चीन आणि काही यूरोपीय देशांत पुन्हा वेगाने वाढल्या कोरोना केस, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून दिले हे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CoronaVirus | भारतातील कोरोना व्हायरस (CoronaVirus) ची स्थिती सध्या ठीक आहे आणि रुग्णांचा ग्राफ खूपच कमी आहे, परंतु शेजारील चीन (China) आणि युरोपमधील काही देशांमध्ये (countries of Europe) स्थिती चिंताजनक बनत आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा स्थितीत भारतातही चिंता वाढू लागली आहे.

 

हा धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव (आरोग्य) यांना पत्र लिहून काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 

आरोग्य सचिवांनी दिल्या या सूचना
राजेश भूषण यांनी आपल्या पत्राद्वारे सर्वांना सांगितले आहे की, सर्वत्र पाच स्तरीय धोरण म्हणजे टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोविड नियमांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या पाच मुद्यांवर सर्व संबंधित अधिकारी आणि विभागांनी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीन धोका लक्षात घेता डॉक्टरही लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगत आहेत. (CoronaVirus)

या देशांमध्ये वाईट स्थिती
कोरोनामुळे चीनची अवस्था पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये कोरोनाचे रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळून येत आहेत. 14 मार्च रोजी, चीनमध्ये 3602 लोकांमध्ये संसर्ग झाला, ही संख्या फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वाधिक आहे. 20 फेब्रुवारीपासून चीनमध्ये दररोज केसेस वाढत आहेत.

 

गेल्या 5 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तिथे दररोज 1000 हून अधिक नवीन केसेस येत आहेत.
चीनमध्ये 2021 मध्ये 15,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 2022 च्या 3 महिन्यांतच संक्रमितांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे.
त्याच वेळी, यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.

 

 

Web Title :- CoronaVirus | corona virus return again in china and some european country union health secretary wrote letter to all states officers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Liver Health Tips | कॉफीपासून फळे आणि भाज्यांपर्यंत, जाणून घ्या कोणत्या प्रकारचे 7 फूड्स लिव्हर ठेवतात हेल्दी?

 

Diabetes Superstar Foods | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘हे’ आहेत 7 हेल्दी सुपरफूड्स, येथे पहा यादी

 

Diabetes Diet | ‘ही’ 2 हिरवी पाने डायबिटीजमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आहेत आश्चर्यकारक, होतात जबरदस्त फायदे