Google चे CEO सुंदर पिचाईची मोठी घोषणा ! भारताला करणार 135 कोटींची मदत

पोलीसनामा ऑनलाइन – देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. आरोग्याची सेवा कमी पडत असल्याने कोरोना रुग्णाची परिस्थिती बिकट पाहायला मिळत आहे. यावरून भारताला काही देशाकडून मदत दिली जात आहे. याबरोबरच आता जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी असलेले गुगल सुद्धा मदतीला दोन हात केले आहे. तर गुगलने भारताला १३५ कोटींचे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अशी घोषणा देखील केलीय. असे गुगलचे सीईओ सुंदर ‘पिचाई यांनी सांगितले.

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरून चिंता व्यक्त केलीय. भारतातील कोरोनाबाबतीत चिंताजनक परिस्थिती बघून धक्का बसला आहे. गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोनाबाबत माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे, सीईओ सुंदर पिचाई यानॆ सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या यंदाच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील अनेक देशातून भारताला मदत पुरवली जात आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया अशा अनेक देशांनी भारताला मदत करण्याबाबत आश्वासन दिलं आहे. गेल्या काही दिवसापासून कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर निर्बंध घातलेल्या अमेरिकेने सुद्धा सहकार्य करण्यास तयार झाले आहे. जगभरातील १० लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी केलीय. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचं आणि शक्य ती सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे.