Coronavirus : ‘तंदुरूस्त’ झालेल्या व्यक्तीपासून किती दिवस ‘अंतर’ ठेवावं, संशोधनात समजल्या महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरससंबंधित अमेरिकन थोरेसिस सोसायटीच्या एका अभ्यासानुसार एक अहवाल आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की संक्रमित व्यक्ती बरा झाल्यानंतर फक्त 14 दिवस तो क्वॉरेंटाइन राहणे योग्य ठरणार नाही कारण यामुळे संक्रमण आणखी पसरु शक्यता आहे.

डायग्नोसिस अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ऑफ कोविड – 19 डिसीज नावाने प्रकाशीत या अहवालात कोरोनासंबंधित अनेक बाबींची माहिती देण्यात आली आहे. हे संशोधन त्या लोकांवर करण्यात आले आहे जे संक्रमणातून बरे झाले आहेत.

14 दिवसांपर्यंत क्वॉरेंटाइन राहण्याचा सल्ला
कोरोना मुक्त झालेल्यांना 14 दिवस क्वॉरेंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे परंतु या अहवालानुसार व्यक्ती बरा झाल्यानंतर देखील बराच काळ हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात जीवंत राहू शकतो. डॉक्टरांनी देखील याबाबत संशोधन करुन सांगितले की कोरोना व्हायरसचा रुग्ण बरा झाल्यानंतर एक आठवड्यानंतर देखील रुग्णाच्या शरीरात हा व्हायरस जीवंत असतो. तर त्याच्या शरीरात तापासारखी लक्षण पुढील 14 दिवसांपर्यंत राहू शकतात.

यावर अमेरिकेच्या टेंपल यूनिवर्सिटीच्या कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थमध्ये महामारी विशेषज्ञ क्रिस जॉनसन म्हणाले की, हा अहवालाचे निष्कर्ष चांगले आहेत. त्यांच्या मते, जर मानवी शरीरात एखादा व्हायरस त्यांना नुकसान न पोहोचवता शरीरात पडून राहिला तर आपले शरीर त्याच्याविरुद्ध लढण्याची क्षमता तयार करते. ज्यामुळे आपण पुन्हा व्हायरसने बाधित होत नाही कारण आपली रोगप्रतिकारक क्षमता त्याचा सामना करण्यास सक्षम असते.

बरे झालेल्या लोकांना घ्यावी लागणार खबरदारी
ठीक झालेले लोकांनी घरातल्यांशी किंवा बाहेरच्यांशी फार संपर्कात येणं टाळावं. त्यांनी संपूर्ण बरं झालं असलं तरी वारंवार हात धुवावेत. जॉनसन यांचे म्हणणे आहे की एकदा संक्रमणातून पूर्ण ठीक झालेल्या लोकांची पुन्हा संक्रमातून वाचण्याची शरीराची क्षमता तयार होते. त्यांच्यातून पुन्हा संक्रमण होणे तसे अवघडच आहे.

You might also like