Corona In India | भितीदायक ! गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 46,164 नवी प्रकरणे; 607 जणांचा मृत्यू

0
19
coronavirus in india vaccination in india mohfw data 26 august 2021
file photo

नवी दिल्ली : Corona In India | देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या (Corona In India) प्रकरणात पुन्हा एकदा तेजी नोंदली गेली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गुरुवारी मागील 24 तासात 46,164 नवी प्रकरणे आली आणि 607 लोकांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोनाने होणार्‍या मृत्यूंची संख्या 600च्या वर गेली आहे. तर मागील 55 दिवसात सर्वात जास्त नवीन प्रकरणे पहिल्यांदा आली आहेत. तर 13 दिवसात नवीन प्रकरणांची संख्या 40 हजारच्या पुढे गेली आहे.

नवीन आकड्यांनतर देशात कोरोनाची आतापर्यंत एकुण प्रकरणे 3,25,58,530 झाली आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या संख्या- 3,33,725 आणि मृतांची संख्या 4,36,365 झाली आहे.

मागील 24 तासात अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 11,398 केसची वाढ झाली आहे. आतापर्यंत 51,31,29, 378 सॅम्पल्सची टेस्टिंग झाली आहे, यामध्ये 17,87,283 सॅम्पल्सची टेस्टिंग 25 ऑगस्टला झाली आहे.

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट ! थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

देशात 60 कोटीपेक्षा जास्त डोस दिल्याचा दावा

मागील 24 तासात 80,40,407 कोरोना व्हॅक्सीनचे डोस देण्यात आले. आतापर्यंत 60,38,46,475 लोकांना डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दावा केला आहे की, व्हॅक्सीनच्या डोसच्या संख्येने बुधवारी 60 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

महाराष्ट्रात 5,031 नवीन प्रकरणे, 216 रूग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात बुधवारी कोविड-19 ची 5,031 नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 216 रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या कालच्या तुलनेत 100 ने जास्त आहे. राज्यात सहा दिवसांच्या आत 5,000 पेक्षात जास्त दैनिक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 19 ऑगस्टला 5,225 नवी प्रकरणे आली होती. राज्यात आता 50,183 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत 342 नवीन प्रकरणे समोर आली असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

– केरळ

31,445 नवीन प्रकरणे; 215 मृत्यु

– आंध्र प्रदेश

1601 नवीन प्रकरणे, 16 मृत्यू

– हरियाणा

15 नवीन प्रकरणे, 1 मृत्यू

– उत्तर प्रदेश

22 नवीन प्रकरणे, 0 मृत्यू

– छत्तीसगढ

52 नवीन प्रकरणे, 0 मृत्यू

– दिल्ली

35 नवीन प्रकरणे, 1 मृत्यू

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती, जाणून घ्या कसे

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : coronavirus in india vaccination in india mohfw data 26 august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update