Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,132 नवीन रुग्ण, 8,196 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Coronavirus in Maharashtra |महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) रोजचा आकडा काही दिवसांपासून 5 हजारांच्या खाली आला आहे. आज 5,132 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new patient) नोंद झाली आहे. तर आज 8,196 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज (discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 62 लाख 09 हजार 364 इतकी झाली आहे. आज 158 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात सध्या 58 हजार 069 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active) आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 96.93 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 158 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 14 लाख 89 हजार 080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी (Laboratory sample) 64 लाख 06 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 46 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 2 हजार 371 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 266 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 215 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 202 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 491008.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2056.
– एकूण मृत्यू – 8863.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 480089.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9604.

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 172 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 189 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267576.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1086.
– एकूण मृत्यू – 4382.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 262238.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5606.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours, 5,132 new patients of Corona discharged 8,196 patients in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Satara Crime | मेहुण्यानेच केला भावोजीचा खून? सातारा जिल्ह्यात खळबळ

Mumbai-Pune Expressway Accident | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर 3 वाहनांचा भीषण अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

Credit Card Market | एचडीएफसी बँकेवरील बॅनमुळे ICICI बँकेचा झाला फायदा, 13.63 टक्के राहिली ग्रोथ