Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1182 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1182 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 21 महापालिकांमध्ये एकाही कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

राज्यात आज 2 हजार 516 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 4 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.99 टक्के झाले आहे. राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे. सध्या 10 हजार 250 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 75 लाख 74 हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 82 हजार 650 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्यात 1 लाख 56 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 801 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
राज्यात आज 58 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत 4567 रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे.
त्यापैकी 4456 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 111 ओमायक्रॉनचे रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 1182 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत, 11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

 

Nandurbar Police | ‘आपले पोलीस’ योजनेंतर्गत नंदुरबार पोलीस दलाला 4 नवीन वाहने, IG बी.जी. शेखर पाटील यांनी दाखविला हिरवा झेंडा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ