Nandurbar Police | ‘आपले पोलीस’ योजनेंतर्गत नंदुरबार पोलीस दलाला 4 नवीन वाहने, IG बी.जी. शेखर पाटील यांनी दाखविला हिरवा झेंडा

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांच्या समस्या लक्षात घेता पोलिसांना सर्व ठिकाणी जलद जाता यावे यासाठी ‘आपले पोलीस’ योजनेंतर्गत नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलाला मिळालेल्या महिंद्रा कंपनीच्या (Mahindra Company) BS-VI श्रेणीतील 4 Bolero Neo N4 वाहने उबलब्ध झाली आहेत. या वाहनांचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महारिनिक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील (Special Inspector General of Police of Nashik Range B.G. Shekhar Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. बी.जी. शेखर पाटील हे नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलाच्या जिल्हा वार्षिक तपासणी (Annual Inspection) निरीक्षणासाठी आले होते.

 

नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पोलिसांना घटनास्थळी तात्काळ पोहचणे गरजेचे आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास जलत गतीने करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून (Government of Maharashtra) नंदुरबार पोलिसांना (Nandurbar Police) ‘आपले पोलीस’ या योजनेंतर्गत चारचाकी व दुचाकी खरेदी करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे 15 चारचाकी बोलेरो वाहने यापुर्वी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध झाली आहेत. यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाला पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil),
अपर पोलीस अधीक्षक विजय पवार(Addl SP Vijay Pawar), पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वाळवी (DySP vishwas valvi),
पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान (DySP Atmaram Pradhan),
उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray),
उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे (Sub Divisional Police Officer Shahada Srikant Ghumre),
पोलीस उप विभागीय अधिकारी अक्कलकुवा संभाजी सावंत (Sub Divisional Police Officer Akkalkuwa Sambhaji Sawant),
मोटार वाहन परिवहन विभागाचे पर्यवेक्षक सहायक पोलीस उप निरीक्षक शेख यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Web Title :- Nandurbar Police | Under ‘Aaple Police’ scheme, Nandurbar police force got 4 new vehicles, IG B.G. Shekhar Patil showed the green flag

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस अधीक्षकांच्या निजी कक्षाचे IG डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

Naryan Rane | नवाब मलिक देशद्रोही व्यक्ती, नारायण राणे यांची घणाघाती टीका

 

Nawab Malik | नवाब मलिकांना दिलासा ! ‘त्या’ दोन मागण्या कोर्टाकडून मान्य