Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाची चिंता लागून राहिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचे (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून येत आहेत. दररोज बाधितांची संख्या आढळून आल्याने राज्याला चिंता लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुचक माहिती दिली आहे. ‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन होत नाहीये, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जाईल,’ असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

 

‘ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, विशेषकरून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने जी नियमावली तयार केली आहे, त्याचे लोकांकडून काटेकोरपणे पालन होत नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जर याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर निश्चितपणाने आपण लॉकडाऊनकडे जात आहोत काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. (Coronavirus in Maharashtra)

काल (बुधवारी) राज्यात सुमारे 3 हजार 900 नव्या रुग्णांची (Corona Virus) नोंद झाली आहे.
तसेच, मुंबईतही दैनंदिन रुग्णांची संख्या वाढते आहे. परिणामी सक्रिय रुग्णांचा आलेख देखील चढता आहे.
शहर-उपनगरात काल (बुधवारी) सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 60 वर पोहोचली आहे.
तर दिवसभरात 2 हजार 510 रुग्ण सापडले आहे. ही वाढती संख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona patients are rise people are not following rules maharashtra heading towards lockdown minister nawab malik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं, मात्र’

 

Pune Crime | पुण्यात 12 वर्षाच्या मुलीने दाखविली ‘बहादुरी’ ! बलात्कार करणार्‍याचा प्रयत्न करणार्‍याला घडविली ‘अद्दल’

 

Gold Price Today | आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या किती झाले स्वस्त