Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, आज 2521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यातच आज मृत्यूसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 973 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

आज 2 हजार 521 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 07 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.01 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यात 01 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित (Omycron) रुग्णांची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona2521 patients discharge in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Party Look | काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून पार्टीमध्ये पोहोचली मलाइका अरोरा; फोटोनं इंन्टाग्रामवर घातला धुमाकूळ..

 

Uddhav Thackeray | ‘मी पुन्हा येणार म्हणून न येणं हे खूप वाईट’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

 

Russia Ukraine War | युक्रेनधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललं हे मोठं पाऊल!